Monday, February 1, 2016

ब्याट बॉल !!

ब्याट बॉल !!!

सध्या अभूतपूर्व Cricket देशप्रेम सगळीकडे झळकत आहे. कालपरवाच संपलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेमध्ये भारताने ऑस्ट्रेलिया चा धुव्वा उडवला आणि ३-० ने मालिका जिंकली. हुर्रे !!!!! भूतोनाभाविष्यति घडलेली हि घटना सुवर्णाक्षरात लिहिली गेली. सुमारे १३९ वर्ष्यानंतर, भारताचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी ने आपल्या निवडक साथीदारासोबत हा पराक्रम केलाय. वनडे आणि टेस्ट सिरीस सपाटून हरलो पण टी २० जिंकल्यामुळे क्रिकेट रसिकांना थोडासा दिलासा मिळालाय. असो……

आजकाल साहेबांचे आणि खेळाडूंचे दौरे खूप वाढलेत. दोघेही कुठे ना कुठे काहीतरी दिवे लावत आहेत. दिवे हा शब्द सकारात्मक रुपात घ्यावा हि नम्र विनंती. असाच एक क्रिकेट संघ ४ वर्षापूर्वी दौर्यावर निघाला होता. अभूतपूर्व पद्धतीने पार पडलेल्या ह्या दौर्याचा मागोवा इथे नमूद करतोय.

कायगाव (जुने) पेट्रोल पंप भागातले युवा क्रिकेटपटू सर्व तयारीनीशी दौर्यासाठी निघाले. ब्याट, बॉल आणि टायर (स्टंप) घेऊन पहिल्या सामन्यासाठी आमच्या घराच्या बाजूला जमा झाले. एकूण ६ खेळाडू; ३ खेळाडू मगर, १ सोनवणे, १ नजन आणि १ वाघे कुटुंबातले. आयताकृती ग्राउंड वर १ विकेट कीपर,१ फलंदाज, १ गोलंदाज आणि ३ क्षेत्ररक्षक उभा राहिले. Match खेळायला पुरेशे लोक नसल्यामुळे नंबर पाडून खेळायचा ठरल. पहिला बॉल टाकणार तेवढ्यात, कीपर ओरडला " बॉल येव्हरीत गेला तर कोण भरून देईन". झालं, "त्वोहा बॉल काय सोन्याच्या हे का"-Batsman. बर्याच "त्व्होहा-माहा, तुपल्या-मपल्या" नंतर सामना अनिर्णित अवस्थेत संपवावा लागला. विहिरी पासून थोडा दूर अंतरावर असलेल्या रस्त्यावर पुढचा सामना खेळायचा ठरलं.

नवीन स्टेडीयम मध्ये विकेटच्या डाव्या बाजूला, नुकतेच नागरलेल रान आणि उजव्या बाजूला पेट्रोल पंपाची भिंत. विकेट म्हणून मधला रस्ता वापरण्याची परवानगी मिळाली होती. नवीन ठिकाणी सामना सुरु झाला. ४-५ ओवर संपले आणि दळण घेऊन चाललेल्या एका बाईला बॉल लागला.  Match परत अनिर्णीत अवस्थेत संपवावी लागली. पुढच्या Match  साठी जागेची शोधाशोध सुरु झाली.

नांगरटी स्टेडीयम

शेवटी नवीन जागा मिळालीच. नवीन स्टेडीयम वर नुकतीच कपाशी काढून झाली होती, त्या मुळे दोन पट्टया मधली जागा विकेट म्हणून वापरण्याच ठरवल. "व्होल वावर इस आवर्स " अस समजुन पुढील सामना सुरु झाला. नवीन विकेट्स जरा वेगळी होती. टप्पा पडल्यावर बॉल कुठल्या दिशेला वळेल हे सांगणं कठीण होतं. बऱ्याचवेळा बॉल पट्टी सोडून जात होता. वारा चालू असल्यामुळे swing bowlers ला फायदा होत होता. फ़क़्त batsman ला बॉल च्या लाईन  मध्ये येवून खेळायला त्रास झाला कारण बॉल कधी पट्टी मध्ये आलाच नाही. "नवीन खेळपट्टी वर खेळणे धोकादायक आहे" हे कारण समोर करून सर्वांनी एकमताने सामना अनिर्णीत अवस्थेत संपवण्याच ठरवल आणि दौऱ्याचा समारोप करून आपापल्या घरी जायचं ठरलं.


कपाशी स्टेडीयम





अशारीतीने कठीण परिस्थितीत आणि वावर बदलत बदलत आमच्या संघाने हा दौरा यशस्वीरीत्या पार पाडल्याबद्दल पंचाक्रोशीमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. सरपंचांनी पुढच्या वर्षी दौरा संपल्यावर नांगरन्याचे आदेश दिले आहेत तसेच कपाशी स्टेडीयम मध्ये पट्ट्यामधील जागा सपाट करून देण्याचे आश्वासन दिले.


जय हिंद !!
जय वावर !!

6 comments:

Unknown said...

haha good one!

SS said...

Too Good! Lai Bhari!!!!

Madhura said...

:) मस्त!
अजून लिही!

Unknown said...

sahi re

yogeshdahitule said...

Thank you all.

yogeshdahitule said...
This comment has been removed by the author.