Wednesday, June 12, 2013

School days

School is the best place in the world for everyone. Students, teachers, parents and so many of them. I recently visited my school and felt nostalgic about the childhood days. Its the wonderland for wanderers. I always wanted to take day off in the school and enjoy home resting or playing. The desperation for going to school was always higher than staying home.
Everyone miss those days.
I am sure everyone will have lot to say about their school, me too. I am sharing few lines with you all.
Hope you will like it.


शाळेत असतांना निबंध लिहायची स्पर्धा होती आणि विषय होता आमची शाळा. पिस्तुलांनी (मित्रांनी) लिहिलेल्या काही ओळी तुमच्यासमोर मांडतो.
पिस्तुल १ :
आमची शाळा लई  भारी हे. शाळेत माझ्यासंग गण्या, पिन्या , पक्या, रव्या, चम्प्या, मिल्या हाये . मी रोज शाळेत येतो. मास्तर लई हाणतो. गृपाठ देतो. पण मला ल्यायला आवडत नाई, म्हणून मास्तर रोज बदडतो. चम्प्या खाल्ल्यावर वर्गात घोरत राहतो. मास्तर त्याच्या नावानी शा देतो.  आई डब्ब्यात मस्त खायला देती. त्यो पक्या मला खउन देत नई. रपारप वरपितो. मी पाचवीत हे आता. इंग्रजी शिकू रायलो.
वाट इज युवर नेम ?. इंग्रजी चा मास्तर लई भारी हे. गाणं म्हणत राहतो. ये बी शी डी. लई मजा येती.
शाळात सुकडी वाटीते. लई खातो.  म्हणून आमची शाळा लई मस्त हाये.
______________________x x _______________________________

निबंध संपला, पण आमच्या शाळेत खरच खूप मजा होती. सगळे पिस्तुल मस्त होते. एकदम गोळ्या मारणारे. मास्तर पण तितकेच मस्त एकदम रायफली सारखे. "एकाच फाईट वातावरण टाईट".  जी .बी  सरांना कोण विसरणार नाही. त्यांची एन्ट्रीच तेव्हडी टेरर होती. वर्गात आल्यावर घड्याळ काढून, खिडकीतून बाहेर एक पिचकारी सोडणार तंबाखू ची. पोर तरर व्हायची. बाबो आज काही खर नाही. सगळे गृहपाठ आणि स्पेलिंग चेक करून झाल्यावर मग सुरु व्हायचा वर्ग.  वाबळे मास्तर एकदम निवांत.
शिदोरे गुरुजी, पार ते धस च्या नाकाला नाक लागेपर्यंत गणित समजाऊन सांगायचे. "म्हशीच्या पव्हा" त्यांचा आवडता शब्द. आठवीत असतांना त्यांनी गणित दिल होत. अतुल ठोंबरे गणित सोडवत होता. मी गाईड उघडल आणि उत्तर लिहून मास्तरांना दाखवल. वर्गात सगळ्यात पहिले गणित सोडून दिलं होतं. मास्तर जाम खुश. पुढचा प्रश्न " तुझा नाव काय ?" मी ' दहितुले". माझा भाऊ नववीत होता आणि गणितात खूप हुशार होता. "तो नववीत ला दहितुले तुझा भाऊ का ?". मी "हो". "अरे वा तुम्ही दोघे भाऊ गणितात एकदम हुशार आहे, अरे वा छान". मी छाती ताणून बेंच कडे आलो. " सरांनी उत्तर लिहायला सुरुवात केली आणि एका ठिकाणी थांबले. " दहितुले आता पुढं काय येणार, लिहून दाखव". मी समोर गेलो आणि मास्तरांना सांगितला नाही येत म्हणून. "कसं काय नाही येत, तू सोडवलं  ना हे गणित आत्ता, का गाइड मधून लिहिलं ?". मी आपला खाली बघत होतो.  "गाढवा, म्हशीच्या पव्हासारखा बसला, रेट खा," गालं ओढून दोन तीन वेळा त्यांच्या भोवती फिरवलं . " तुझा भाऊ पहा, आणि तू काय करतो"  अजून एक कानाखाली देऊन " मला वाटला दोन्ही भाऊ हुशार हे, पण हे काय कामाचं , जाय व्हय". असा म्हणून कानाखाली अजून एकदा अष्टविनायक काढला. मी आपला जागेवर जाउन बसलो. अजून लक्ष्यात आहे ती वेळ.  पण शिदोरे मास्तर खूप जीव लाऊन शिकवायचे.
शिकवतांना त्यांना कळत नव्हता कि ते आमच्या नाकाजवळ येउन म्हणायचे " त्या मुळे  ते दोन त्रिकोण समरूप होतात, चम्प्या गाढवा कुठं  पाहतो". एवढा इंटरेस्ट घेवून शिकवणारा मास्तर क्वचितच सापडतो.  मजा यायची पण शाळेत, चम्प्या बऱ्याचदा झोपलेला असायचा, सगळी लाळ त्याच्या तोंडावर आणि इकडं, तिकडं  पडलेली असायची. कातकाडे सर एकदा मला समजून माझ्या भावालाच बोलत होते.

हल्लीच आलेला शाळा चित्रपट बघून लई आठवण आली शाळेची, म्हणून शाळेत गेलो होतो.
धन्या, अमोल , प्रमोद  आणि बरेच मित्र भेटले.

"प्रत्तेकाच्या आयुष्यात हसू आणणारी शाळा,  जसा क्षणोक्षणी असणारा जिव्हाळा,
उन्हाळा, हिव्हाळा असो कि असो पावसाळा, रोज मी जाणार आमची शाळा…"

धन्यवाद.

______________________x x _________________