नमस्कार
एक छोटीशी गोष्ट लिहित आहे..
लग्नाची गडबड सुरु व्हती सगळीकडे , सगळे पावणे आले होते आन मंग फक्त दोनच दिवस बाकी व्हते लग्नासाठी. महिला मंडळ बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरु व्हता. मी त्याचे फोटो काढत होतो. आई गावातल्या सर्व बायांना बांगड्या भरण्यासाठी बोलावत होती. ''मावशी चला लवकर, बांगड्या भरायला, आत्या चला, वाहिनी चला." दोन ते चार तासानंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम संपला. पण त्या वेळात ज्या घडामोडी झाल्या त्याचे किस्से लई दिवस चालू व्हते. गावात्यला बाया बांगड्या भरण्यात व्यस्त होत्या. सर्वांना भेटून झाल्यावर मी रस्त्याच्या बाजूला उभा होतो, समोरून गावातली एक बाई बांगड्या भरण्यासाठी रस्ता ओलांडत होती. त्यांनी बहुतेक बांगड्या भरल्या होत्या आणि लग्नाचा आहेर आणण्यासाठी घरी गेल्या होत्या ... घरासमोर एक धाबा आहे, ती बाई रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चालत होती. तिने रस्ता ओलांडण्यासाठी एक पाउल उचलले पण तितक्यात मागून एका फटफटी ने तिला जोरात टक्कर मारली, सर्व जन फ़क़्त बघत होते. मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभा होतो, सगळीकडे गडबड सुरु झाली. एक-दोन मिनिटात ५० लोक जमा झाले तिथे. या अपघातामध्ये फटफटी स्वार आणि मागे बसलेला माणूस दोघेही पडले. सगळीकडे एकच आरडओरड सुरु झाली. "अकसिजन झाला, अकसिजन झाला " सर्व जन त्या धाब्यावर जमा झाले. काय झाले याची उत्सुकता सर्वांना होती. सगळेजण त्या बाईकडे लक्ष्य देत होते आणि त्या फटफटी वाल्या बाबाला शोधात होते. चोप द्यायला सगळी मंडळी तयार झाली होती, एका गावातल्या बायीला फटफटी ने उडवले म्हणून सगळे लोक तापले होते. पण तितक्यात तो बाबा उठला आणि त्या बाईला म्हणत होता " तुला कई कळत नई का ग कसं चालायचं रस्त्यावर हे रे... " सगळ्यांनी जेव्हा त्या माणसाला पाहिलं तेव्हा सगळे जन चकित झाले, तेवढ्यात तात्यांनी मला सागितलं " अरे ती तर त्याची बायको हे". जगातला असा एकमेव अपघात मी माझ्यासमोर बघितला. नवऱ्याने बायकोला उडवले. सुदैवाने कुणालाही जास्त दुखापत नाही झाली. थोडीशी जखम झाली होती पण धाब्यावरच मिलिटरी ची ambulance गाडी उभी होती. लगेचच जख्मावर मलमपट्टी लावली. पण जखम थोडीशी मोठी असल्यामुळे बाजूच्या गावात जाऊन बाकीचे उपचार करायचे ठरलं . या सगळ्या घडामोडी मध्ये गाडी बसलेला दुसरा माणूस मार खायच्या भीतीमुळे पळून गेला. सगळे लोक त्याला शोधत होते, त्याला काही लागला आहे का याची चौकशी करत होते.
पण जगातला असा आगळावेगळा किस्सा मी अनुभवला म्हणून इथे लिहित आहे .
दुसरा असाच एक आगळावेगळा किस्सा
त्या दिवशी मी बाबांबरोबर मंदिरात दिवाबत्ती करायला गेलो होतो. यायला थोडा उशीर झाला. अंधार पडला होता. आम्ही घराच्या जवळ आलो, तेव्हा बघितला १०-१२ लोक तात्याच्या गाडी बरोबर खेळत होते. गाडी पडली होती आणि शिवाजी, बंडूभाऊ, बाळूभाऊ, तात्या व अजून बरेच लोक तिथे जमले होते. मी तात्याला विचारला "काय झाला तात्या". साप साप साप असंच चालू होतं सगळीकडे. बऱ्याच वेळानंतर कळले कि गाडी मध्ये साप घुसला आहे, एक दुचाकी गाडी मध्ये साप घुसण्याची बहुदा हि पहिलीच वेळ असेल. सापाचे दर्शन पहिल्यांदा भंद्याला झालं. भांद्या सायकल चे चक्कर मारत होता. संध्याकाळी तो तात्याच्या दुकानासमोर चक्कर मारत होता तेंव्हा त्याला तो साप दिसला. नंतर तात्यांनी त्याला दगड मारून मारून जखमी केला. तात्यांनी त्याला गाडीत जातांना पाहिलं. तो गाडी मध्ये मागच्या चाकामधून वर जातांना पाहिलं. झालं नंतर मग एकच हल्लाकोल माजला. आजू बाजूला सगळे माणसे जमली आणि गाडी उलटी पालटी करून बघत होती . सकाळी हाच साप नाग झाला होता. कार्तिक (दोन वर्षाचा भारत चा मुलगा ) टायर खेळत होता. गिरणी च्या बाजूला टायर खेळत असतांना त्याचा पाय चुकून सापावर पडला आणि त्या सापाने लगेचच फना उगारला. त्याच्याकडे सगळेच आ वासून बघत होते. पोऱ्या रडायला लागला जोर जोरात. अरुण, काकू आणि बरेच जन तिकडे बसले होते पण सगळे जन घाबरले होते, नागाला बघून. कार्तिक रडत होता खूप वेळ, आमची बई म्हणाली त्याचे कान फुका. मग त्याचे कान फुकून झाल्यावर त्याचा रडणं थांबला. तोपर्यंत त्या नागाचं पलायन झालं होतं गिरणी च्या मागे. दिवसभर लाईट नसल्यामुळे गिरणी बंद होती. पण संध्याकाळी लाईट आली आणि गिरणी चालू झाली. गिरणी च्या हादऱ्यामुळे नागाने तिथून पलायन केलं आणि तो दुकानासमोर आला. भंद्याने तो पाहिला आणि तात्यांनी त्याला मोटारसायकल मध्ये जाताना पाहिलं.
बराच वेळ डोकं लढवला तरी साप नाही सापडला म्हणून सगळे म्हणले कि साप गाडीतून पळून गेला, आजूबाजूला उजेड कमी असल्यामुळे आणि गाडीच्या चाकामध्ये पण नाही सापडला म्हणून सगळ्यांनी सांगितला कि तो गाडीत नाहीये. पण तात्यांनी रेटून धरला होतं कि साप तिथेच आहे. शेवटी गाडीचं सीट उघडायचा ठरलं. पण हिम्मत होत नव्हती कुणाची, शेवटी बाळूभाऊ आणि बंडूभाऊ दोघांनी मिळून सीट उघडला आणि सर्वांनी त्या सुंदर प्राण्याला बघितलं. सीट च्या पाठीमागे मागच्या लाईट च्या बॉक्स मध्ये शांत बसला होता. त्याला कुठ माहित होता कि त्याच्यामुळे सगळीकडे गोंधळ सुरु होता. दोन-तीन फूट लांबीचा तो साप शांतपणे बसला होता. नंतर बाळासाहेबांनी त्याला डिवचत डिवचत बाहेर काढला आणि त्याचा जीवन संपुष्टात आल. खूपच वाईट वाटलं बघतांना पण इथे इतरांचा अनुभव आणि माझी मजबुरी या व्यतिरिक्त माझ्याकडे विचार करण्यासारखा काही नव्हतं.
ह्याप्पी निव यीयार ...इट्स इंग्लिश फेस्टिवल ऑफ द वर्ल्ड ..
जय हिंद जय महाराष्ट्र..

4 comments:
Yogesh saheb apratim blog!! Dolyasamor purna chitra ubha zala! Aple shatasha abhar aple anubhav madlyabaddal11
Aabhari Aahe Mayurrao..
Atleast Kunitari Vaachtay...
Yogesh Bhau lai kadak kharach samor baghitalyacha anubhav ala.....
Dhanywad vakil saheb..
Post a Comment